Type Here to Get Search Results !

रमाई रमाई घरकुल योजने पासून बौद्ध समाज वंचित

रमाई घरकुल योजनेपासून बौद्ध समाज वंचित,जिल्हापरिषदेत ३०२ प्रस्ताव धुळखात, 
संघर्ष समितीचा आंदोलनाचा इशारा. 


मुरबाड (आण्णा साळवे)

बौद्ध घटकांसाठी  रमाई घरकुल योजना शासनाने तयार केली परंतु  तालुक्यातील ३० ते ३५ हजार बौद्ध समाजबांधवांचे स्वप्न प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे धुळीस मिळत असल्याचा आरोप संघर्ष समितीने केला आहे.यावर वेळीच उपाय योजना केली नाही, आणि प्रस्ताव मंजूर केले नाहीत तर मुरबाड पंचायत समिती कार्यालया समोर आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते आणि संघर्ष समितीचे तालूका अध्यक्ष गुरुनाथ पवार, सरचिटणीस भाऊसाहेब रातांबे, माजी सरपंच नितीन खंडागळे यांनी प्रशासनाला दिला आहे.
                    सन २०२४-२५ मध्ये १०५ घरकुल मंजूर करून त्यातील ठाणे जिल्हा परिषदेकडे तब्बल ३०२ प्रस्ताव प्रलंबित असून, ते ‘फायलींमध्येच’ बंदिस्त असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक गोर गरीब लाभार्थी अद्यापही घरकुलापासून वंचित आहेत.या दुर्लक्षित कारभारामुळे मुरबाड तालुक्यातील आंबेडकरी समाजात तीव्र नाराजी पसरली असून संताप व्यक्त केला जात आहे. या गंभीर प्रकरणी मुरबाड तालुका संघर्ष समितीचे वतीने सुस्त प्रशासन जागे व्हावे या मागणी साठी प्रशासनाला इशारा दिला आहे. जिल्हा परिषदेने व प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही तर बौद्ध समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात  इशारा दिला आहे.रमाई आवास घरकुल योजना ही गरिबांसाठीची आशा आहे, मात्र जिल्हा परिषदेसारख्या यंत्रणेकडून बौद्ध घटकांच्या विकासाकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे हे अत्यंत गंभीर आहे. प्रशासनाने तात्काळ प्रलंबित प्रस्तावांना मंजुरी देऊन लाभार्थ्यांना दिलासा द्यावा,’ अशी मागणी संघर्ष समितीने केली आहे.
.              याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी रोहन घुगे यांनी तातडीने लक्ष घालावे,बौद्ध समाजाच्या प्रगतीचा,विकासाचा आलेख उंचावण्याचे काम शासन दरबारीं  करावे.मात्र ठाणे जिल्हापरिषद याकडे कां दुर्लक्ष करते, याचा तपास मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी घ्यावा.ही दुटप्पी भूमिका थांबवून, यावर तात्काळ कार्यवाही करावी अशी मागणी करत संघर्ष समितीच्या वतीने उग्र आंदोलन छेडन्याचा  इशारा  दिला आहे.

Post a Comment

0 Comments