Type Here to Get Search Results !

गद्दारी नंतर भूमिपूजन! नगराध्यक्ष संतोष चौधरी यांच्या हस्ते वार्ड क्रमांक २ मध्ये कोट्यावधी रुपयांच्या कामांचा शुभारंभ

गद्दारी नंतर भूमिपूजन! नगराध्यक्ष संतोष चौधरी यांच्या हस्ते वार्ड क्रमांक २ मध्ये कोट्यावधी रुपयांच्या कामांचा शुभारंभ 


मुरबाड-प्रतिनिधी(आण्णा साळवे)

मुरबाड उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपच्या नगरसेवकांनी गद्दारी करून मुरबाड परिवर्तन पॅनेलमध्ये सामील होणे पसंत केले होते.परंतु परिवर्तन जास्त काल टिकले नाही. नगराध्यक्ष संतोष (बाबू) चौधरीं यांनी परिवर्तन पॅनलच्या मोरक्याला फाट्यावर मारत आमदार कथोरेंच्या वाढदिवसाला हजेरी लावून शुभेच्छा दिल्या. तद्नंतर आता काल माजी उपनगराध्यक्षा मानसी मनोज देसले यांच्या प्रभागातील विकास कामांच्या उद्घाटनाला हजेरी लावून होती ती कंबरेला गुंडाळून कोट्यावधीच्या कामाचा उद्घाटन केला..त्यामुळे नगराध्यक्ष संतोष चौधरी यांचे स्वगृही परतीचे मार्ग खुले झाले असल्याची चर्चा मुरबाड मध्ये रंगली आहे. मात्र गद्दारी नंतर भूमिपूजन केल्याने त्यांच्यावर त्यांच्यावर मुरबाड शहरातून टीका होतं आहे.
नगराध्यक्षपदी बसण्यासाठी आमदार किसन कथोरे यांच्या राजकीय पाठबळावर संतोष चौधरी यांनी उपनगराध्यक्ष निवडणुकीत राम दुधाळे यांच्या गोटात जाऊन परिवर्तन पॅनेल निर्माण केले होते. मात्र हा ‘रामाचा खांदा" संतोष चौधरींना पेलवलेला दिसत नसून , राजकीय शहाणपण दाखवित त्यांनी घरवापसी केली असल्याचे चर्चा होत आहे.

आमदार किसन कथोरे यांच्या वाढदिवसानिमित्त निवासस्थानी जाऊन अखेर चौधरी यांनी ‘स्वगृही’ मान्य करत पुन्हा आमदारांच्या अस्तित्वाला नम्र अभिवादन केले. यानंतर नगरपंचायतीच्या माजी उपनगराध्यक्षा मानसी देसले यांच्या वार्डात जाऊन तब्बल दोन कोटींच्या कामांचे भूमिपूजन केले.

या भूमिपूजनाच्या निमित्ताने संतोष चौधरी पुन्हा आमदार गोटात परतल्याने राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. राम दुधाळे यांच्यासोबत दोन ते तीन नगरसेवक उरतील, बाकी सर्व पुन्हा किसन कथोरे यांच्या गोटात परततील, अशी तालुक्यात राजकीय कुजबुज सुरू आहे. “बाप तो बापच असतो” या चर्चेला उधाण आले असून, चौधरी यांचे परिवर्तन पॅनेलमधील राजकीय भविष्य धोक्यात आले होते. राम दुधाळे यांनी राजकीय फायद्यासाठी वारंवार पक्षांतर करून राजकारणात आपले स्थान टिकवण्याचा प्रयत्न केला, मात्र जनतेला हे मान्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे.कधीच स्वतंत्रपणे निवडून न आलेले, नेहमी कथोरे यांच्या आधारावरच पदे उपभोगलेले नगराध्यक्ष आता पुन्हा ‘स्वगृही’ परतलेले आहेत. या घडामोडींमुळे भविष्यात गद्दारी करणाऱ्यांचे कंबरडे जनता जनार्दन मोडतील, अशी तालुक्यात सर्वत्र चर्चा सुरू आहे.परिणामी यावरून असे दिसते की, रामाला वनवासात पाठवण्याची परिवर्तन पॅनलची तयारी असल्याचे बोलले जाते.

Post a Comment

0 Comments