मुरबाड नगरपंचायतीकडून वनविभागाच्या जागेत बेकायदेशीर अतिक्रमण
जिल्हाध्यक्ष आण्णा साळवे यांची कारवाई ची मागणी.!
मुरबाड (अण्णा साळवे) : मुरबाड नगरपंचायतीने वनविभागाच्या हद्दीत कोणतीही अधिकृत परवानगी न घेता बेकायदेशीर अतिक्रमण करून लाखो रुपयांचा शासकीय निधी खर्च केल्याचा गंभीर आरोप अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष आण्णा साळवे यांनी केला आहे.
मौजे मुरबाड शेळके पाडा तसेच काळू-बाळू धाब्यांच्या शेजारी नगरपंचायतीने वनविभागाच्या जागेत संरक्षण भिंत बांधून शासकीय निधी खर्च केला असून, या कामासाठी वनविभागाची कोणतीही मंजुरी घेण्यात आलेली नाही, असा ठपका श्री. साळवे यांनी ठेवला आहे.
विशेष म्हणजे या संदर्भात नगरपंचायतीने वनविभागाकडे कोणताही अधिकृत पत्रव्यवहार केला नसल्याचा आरोप करत, वनविभागाच्या अधिकार्यांनी या बेकायदेशीर कामाकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केल्याचा आरोप देखील श्री. साळवे यांनी केला आहे.दर अतिक्रमण तातडीने हटवून संबंधित नगरपंचायत अधिकारी, ठेकेदार तसेच वनविभागातील जबाबदार अधिकार्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी आपल्या निवेदनातून केली आहे. जर कारवाई करण्यात आली नाही, तर वनविभागाच्या कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने आमरण उपोषण करण्याचा इशारा देखील जिल्हाध्यक्ष आण्णा साळवे यांनी दिला आहे.
Post a Comment
0 Comments