मडकेपाडा येथील पंचायत समितीच्या जागेवरील अतिक्रमण हटवण्यासाठी मुरबाड बिडीओंची कारवाई.
समाजसेवक अण्णा साळवे यांच्या तक्रारीची दखल घेत तात्काळ केली मोजणी.
मुरबाड प्रतिनिधी - मुरबाड पंचायत समितीच्या नावे मौजे साजई ग्रामपंचायत हद्दीत मडकेपाडा येथे राखीव जमीन आहे. ही जागा पंचायत समितीला काही कारणास्तव दिली आहे. मात्र या सातबाऱ्यावर काही मुरबाड नगरपंचायतीच्या नगरसेवकांनी राजकीय बळाचा वापर करुन राहण्यासाठी घरे बांधली, हे अनधिकृत बांधकाम तोडण्याची मागणी अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचे अण्णा साळवे यांनी केली असता त्यांची दखल घेत मुरबाड पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ लता गायकवाड यांनी तात्काळ मोजणी करत कारवाई करणार असल्याचे स्प्ष्ट झाले आहे.यावेळी तालुक्यातील कार्यकर्ते पत्रकार, पोलीस कर्मचारी आणि पंचायत समितीचे कर्मचारी उपस्थित होते.
. बाबत सविस्तर वृत्त असे की ज्यांनी अतिक्रमण केले आहे. त्यांनी ती घरे गरीब गरजू लोकांना भाडे तत्वावर देऊन त्यांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा करुन घेतला. विशेष म्हणजे या घरांना घरपट्टी असीसमेन्ट, व बांधकाम परवानग्या आपले विभागाचे तत्कालीन ग्रामसेवक, सरपंच, यांनी संगणमताने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी दिल्या असाव्यात असा अंदाज आहे. घरपट्टी देताना ग्रामपंचायतीचे काही नियम अटी असतात, त्या बासणात गुंडाळून,परवानग्या आणि घरपट्टी कशा दिल्यात याची चौकशी करावी.
. महोदय आपल्या नावे असणाऱ्या सातबारावर ज्या लोकांनी अतिक्रमण करुन घरे बांधली आहेत, त्यांना आपलेच ग्रामसेवक, सरपंच यांनी घरपट्टी आकारणी कशी केली? या बांधकमाला परवानगी कोणी दिली? आणि ही घरे कोणी बांधली,? यांची चौकशी करुन शासनाची जमीन लाटण्याचा ज्यांनी प्रयत्न केलाय त्यांची चौकशी करुन कारवाई करावी.या पंचायत समितीच्या सातबाऱ्यावर ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक, यांनी टॅक्स आकारणी कोणत्या पुराव्याच्या आधारे केली आणि कोणी बांधकाम केलंय याची चौकशी करावी आणि तात्काळ तोडून जमीनदोस्त करावी.याबाबत आपण योग्य चौकशी करुन कारवाई केली नाही तर आपल्या कार्याल्यासमोर आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
Post a Comment
0 Comments