माळशेज घाट — भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना, आरपीआय (अ)– मित्र पक्ष व महायुती यांच्या संयुक्त विद्यमाने एम.टी.डी.सी. रिसॉर्ट, माळशेज घाट येथे भव्य कार्यकर्ता मेळावा व स्नेहभोजन कार्यक्रम जल्लोषात आणि यशस्वीरित्या पार पडला.
या कार्यक्रमास मुरबाड विधानसभा आमदार मा. श्री. किसन कथोरे साहेब, सिडको माजी अध्यक्ष प्रमोदजी हिंदुराव साहेब, जिल्हाध्यक्ष जितेंद्रजी डाकी, मुरबाड राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष चंद्रकांतजी बोष्टे, भाजपा तालुकाध्यक्ष दिपक पवार, श्री. अनिल घरत, श्री. जितेंद्र भावार्थे, शिवसेनेचे कांतिलालजी कंटे, आरपीआयचे दिनेशजी उघडे, TDCC बँक संचालक राजेशजी पाटील, उल्हासभाऊ बांगर, मा. नगराध्यक्ष राजेंद्रजी घोरपडे, नगरसेवक किरण भोईर, संतोष पवार, भाजपा अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष श्री. आण्णा साळवे, माजी नगराध्यक्ष मोहन सासे, मुकेश विशे, प्रतिक प्रमोद हिंदुराव यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.
यावेळी आमदार किसन कथोरे साहेबांनी आपल्या भाषणातून विरोधकांचा चांगलाच समाचार घेत आपल्या भागातील विकासकामांची माहिती दिली. तसेच, पक्षाचे सर्व कार्यकर्ते, युवानेते व महिला पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपली संघटनेप्रती निष्ठा आणि एकजूट ठामपणे दाखवली.
Post a Comment
0 Comments