अलिबाग (जि. रायगड) — उत्कृष्ट कायदा सुव्यवस्था राखणारे, पोलीस खात्यात देव माणूस म्हणून ओळखले जाणारे आणि जनसामान्यांचा आधारस्तंभ असलेले पोलीस निरीक्षक श्री. प्रसाद दशरथ पांढरे यांना शौर्यदक राष्ट्रपती पोलीस पदक (PPM) आणि गुणवत्तापूर्वक सेवेबद्दलचे पोलीस पदक (PM) बहाल होणार आहे.
मा. राज्यपाल महोदयांच्या हस्ते हा पदक प्रदान सोहळा सोमवार, दिनांक २९ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजता ‘दरबार हॉल’, राजभवन, मुंबई येथे पार पडणार आहे. यासाठी श्री. पांढरे यांनी दिनांक २६ जुलै २०२५ रोजी पोलीस महासंचालक कार्यालय, मुंबई येथे रिपोर्ट करायचे आहे.
. मुरबाडमध्ये कर्तव्य बजावत असताना पांढरे साहेबांनी दाखवलेली कर्तव्यनिष्ठा साऱ्या तालुक्याला माहित आहे. चोरीमुक्त मुरबाड घडवताना त्यांनी पूर्ण रात्र पेट्रोलिंग केली, गुन्हेगारीला आळा घातला, आणि सामान्य माणसाला कायद्याचा धाक प्रेमाने समजावून दिला. आजही लोक त्यांना छोट्या मुलांच्या गळ्यातील ताईत आणि गोरगरीबांचा आधार म्हणून ओळखतात.मुरबाड पोलिस ठाण्यातील कार्यकाळातच ज्या पदकाची घोषणा झाली होती, त्याचा प्रत्यक्ष सन्मान आता मिळत आहे, हे मुरबाडवासीयांसाठीही अभिमानास्पद आहे.मा. पोलीस अधीक्षक कार्यालय, रायगड–अलिबाग यांच्याकडून आदेश निर्गमित करण्यात आले असून, पदक धारक अधिकाऱ्यांनी मानवंदना आणि गणवेशाचे नियम काटेकोरपणे पाळावेत असे स्पष्ट करण्यात आले आहे.
. मुरबाडकरांचे आशीर्वाद आणि प्रेमच श्री. पांढरे साहेबांच्या यशाचे खरे भागीदार आहेत!
Post a Comment
0 Comments