Type Here to Get Search Results !

सासणे ग्रामसेवक आणि सरपंच यांचा महाप्रताप.खोटी परवानगी आणि घरपट्टी दिल्याने जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार.

सरपंच आणि ग्रामसेवकांचा मनमानी कारभार : गावकऱ्यांचा आरोप, जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

मुरबाड (आण्णा साळवे)
मौजे सासणे, ता. मुरबाड येथे ग्रामपंचायतीच्या सरपंच व ग्रामसेवक यांनी गावकऱ्यांच्या विश्वासाला तडा देत परस्पर निर्णय घेतल्याचा गंभीर आरोप श्री. राजेंद्र तुकाराम खंडागळे या रहिवाशाने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करून केला आहे.

तक्रारीनुसार, गावातील रहिवासी व मागासवर्गीय समाजातील खंडागळे यांच्या घराशेजारी एअरटेल मोबाईल टॉवर बसवण्यासाठी सरपंच व ग्रामसेवक यांनी कोणतीही ग्रामसभा न घेता तसेच ग्रामस्थांची परवानगी न घेता थेट परवानगी दिली. या टॉवरमुळे खंडागळे यांना त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या शेजारील जमिनीवर घर बांधताना भविष्यकाळात धोका निर्माण होणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

याशिवाय, टेपाचीवाडी येथील सर्व्हे नंबर ४६३ मधील घरबांधणी प्रकरणात देखील गंभीर अनियमितता उघड झाली आहे. या ठिकाणी सातबाऱ्यावर मूळतः दहा जणांची नावे असताना, सरपंच व ग्रामसेवकांनी केवळ आठ जणांची खोटी सह्या दाखवून दोन हक्कदारांना डावलत घरपट्टी व बांधकाम परमिशन मंजूर केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या मनमानी कारभारामुळे गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून जिल्हाधिकारी व गटविकास अधिकाऱ्यांकडे तात्काळ चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी खंडागळे यांनी केली आहे. अन्यथा पुढील आंदोलनात्मक पावले उचलली जातील असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Post a Comment

0 Comments