Type Here to Get Search Results !

विलास जाधव यांची राष्ट्रीय चर्मकार महासंघ मुरबाड तालुका अध्यक्षपदी एकमताने निवड!

विलास जाधव यांची राष्ट्रीय चर्मकार महासंघ मुरबाड तालुका अध्यक्षपदी एकमताने निवड! 

मुरबाड | ३ ऑगस्ट २०२५

              मरबाड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा कार्यकर्ता, प्रमोदजी हिंदुराव यांचे कट्टर समर्थक, तरुण तडफदार, जिद्दी मेहनती, युवा नेतृत्व विलास कमलाकर जाधव यांची राष्ट्रीय चर्मकार महासंघ मुरबाड तालुका अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली आहे. ही निवड शिवनेरी शासकीय विश्रामगृह, मुरबाड येथे आयोजित विशेष बैठकीत पार पडली.

या नियुक्तीसाठी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बबनराव घोलप आणि प्रदेशाध्यक्ष डॉ. शांताराम कारंडे यांचे मार्गदर्शन लाभले. समाजहिताच्या दृष्टिकोनातून नव्या जोशात काम करणाऱ्या युवकाला संधी देण्यात आली आहे.

🔷 या कार्यक्रमात पुढील पदाधिकाऱ्यांचीही निवड करण्यात आली.▪️ शाम नारायण जाधव – ठाणे जिल्हा उपाध्यक्ष, प्राचार्य राजू हरी रोकडे – मुरबाड तालुका सचिव

 या निवडीनंतर विलास जाधव यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले –"संघटनेचे काम जोमाने राबवून चर्मकार समाजाच्या तळागाळातील घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी पूर्ण समर्पित राहीन. सामाजिक न्याय, शिक्षण, रोजगार व हक्कांसाठी आवाज बुलंद ठेवून संघटना मजबूत करण्याचा निर्धार केला आहे."

यावेळी या कार्यक्रमास राम बनसोडे – ठाणे जिल्हाध्यक्ष, राष्ट्रीय चर्मकार महासंघ, दिनेश उघडे – अध्यक्ष आरपीआय (आठवले) मुरबाड तालुका ,भैरवनाथ वाघमारे – कल्याण-डोंबिवली जिल्हाध्यक्ष, गजेंद्र राऊत – जिल्हा सरचिटणीस,सोमनाथ राऊत – ज्येष्ठ मार्गदर्शक, भिकाजी कांबळे – ज्येष्ठ समाजसेवक, रमेश देसले – आरपीआय मुरबाड तालुका उपाध्यक्ष, धनंजय थोरात – आरपीआय युवक अध्यक्ष, मुरबाडप्रा. नरेश मोरे – संस्थापक अध्यक्ष, लोकक्रांती संघटना,महेश जाधव, सचिन शिंदे, चंद्रकांत चव्हाण, श्री. सुराडकर, शिवाजी भिसे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि मोठ्या संख्येने समाजबांधव यावेळी उपस्थित होते.

🔔 या निवडीमुळे चर्मकार समाजामध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, नव्या नेतृत्वाकडून ठोस कार्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

0 Comments