Type Here to Get Search Results !

मुरबाड प्रभाग क्रमांक २ मध्ये हायटेक विकासकामांचे लोकार्पण; श्रीहनुमान मंदिर प्राणप्रतिष्ठा, व्यायामशाळा व समाजहॉलचे उद्घाटन थाटात

मुरबाड प्रभाग क्रमांक २ मध्ये हायटेक विकासकामांचे लोकार्पण; श्रीहनुमान मंदिर प्राणप्रतिष्ठा, व्यायामशाळा व समाजहॉलचे उद्घाटन थाटात

मुरबाड, ता. ४ ऑगस्ट:

लांबाचीवाडी (ता. मुरबाड) परिसरातील जनतेच्या दीर्घकालीन अपेक्षांना मूर्त स्वरूप देणारे विविध महत्त्वपूर्ण विकास प्रकल्प अखेर पूर्णत्वास पोहोचले असून, त्यांचे लोकार्पण सोहळे व भूमिपूजन कार्यक्रम शनिवार, दि. ०९ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आले आहेत. या कार्यक्रमाचे उद्घाटन कार्यसम्राट आमदार मा. श्री. किसनजी शंकर कथोरे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.


                        या भव्य कार्यक्रमात श्रीहनुमान मंदिराची प्राणप्रतिष्ठा, तसेच महाराष्ट्रातील आदिवासी वस्तीतील पहिली वातानुकूलित दुमजली व्यायामशाळा व समाजहॉलचे लोकार्पण होणार आहे.
                    नगरसेविका सौ. मानसी मनोज देसले आणि समाजसेवक श्री. मनोज देसले यांच्या पुढाकाराने, आमदार किसनजी कथोरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागातील विकासाचे चित्र पालटले आहे. रस्ते काँक्रिटीकरण, स्ट्रीटलाईट्स, नाले-गटारी नुतनीकरण, अंगणवाडी, शाळा इमारत, ओपनजिम, हायटेक स्मशानभूमी, आणि पुरग्रस्त भागातील संरक्षण भिंती व सिमेंट रस्ते अशा अनेक विकासकामांची यशस्वी अंमलबजावणी करण्यात आली आहे.
                "प्रत्येक कृती प्रभागाच्या हितासाठी, प्रत्येक क्षण प्रभागाच्या विकासासाठी" हा मंत्र अंगीकारून कार्यरत असलेले देसले दांपत्य आज प्रभागवासीयांच्या विश्वासाचे केंद्रबिंदू ठरले आहेत. त्यांच्या कार्यकुशलतेमुळे, लोकसहभागातून स्वाभिमान निर्माण करणारी विकासप्रवृत्ती रुजली आहे.
या लोकार्पण सोहळ्यात जनतेचा सहभाग हीच खरी ताकद असल्याने, परिसरातील सर्व नागरिकांनी या ऐतिहासिक प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या विकासदिनी साक्षीदार व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments