Type Here to Get Search Results !

जिल्हा परिषद - पंचायत समिती प्रशासनाचा भोंगळ कारभार. एकाच व्यक्तीला दुहेरी मानधन व वेतन

जिल्हा परिषद, पंचायत समिती प्रशासनाचा भोंगळ कारभार — पंचायत समितीत एकाच व्यक्तीला दुहेरी मानधन व वेतन! 


मुरबाड प्रतिनिधी अण्णा साळवे

 मुरबाड तालुक्यात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. उमरोली (खु) येथील पुनम पवार या ग्रामपंचायतीच्या उपसरपंच असून, त्या एका पक्षाच्या कार्यकर्त्या म्हणूनही सक्रिय आहेत. मात्र, याच पुनम पवारने, पूनम डोहाळे या नावाने मुरबाड पंचायत समितीमध्ये पेसा समन्वयक पदावर नियुक्ती घेऊन पदभार स्वकरलेला आहे.


पेसा समन्वयक पदासाठी झालेल्या निवड प्रक्रियेत शासन निर्णय व नियमांची उघड उघड पायमल्ली झाली असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे.पुनम डोहाळे/पवार यांनी सादर केलेली कागदपत्रे, करारनामा, नियुक्ती आदेश, आजपर्यंत अदा झालेले वेतन, तसेच उपसरपंच म्हणून मिळालेले मानधन — या सर्वांचा तपशील अद्याप ठाणे जिल्हा परिषद आणि मुरबाड पंचायत समितीला दिलेला नाही.स्थानिक नागरिकांचा सवाल असा आहे की, एकाच वेळी दोन पदे सांभाळत शासनाकडून दुहेरी आर्थिक लाभ घेऊन उघडपणे फसवणूक केली असल्याचे समजते. त्यामुळे यां व्यक्तीवर कारवाई होणे गरजेचे होते. पण निगर गठ्ठ प्रशासनातील अधिकारी यांनी यावर कारवाई का केली नाही? असा सवाल उपस्थित होतो. तसेच, शासनाची फसवणूक केल्याच्या या प्रकरणी पुनम डोहाळे/पवार यांच्यावर गुन्हा दाखल करून, पुढील पाच वर्षे निवडणूक लढण्यास बंदी घालण्याचा आदेश जिल्हा परिषद प्रशासन काढणार का? 

या प्रकरणामुळे मुरबाड तालुक्यात संतापाची लाट पसरली असून, ठाणे जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Post a Comment

0 Comments