Type Here to Get Search Results !

मढ आश्रमशाळेची इमारत अपूर्ण; ठेकेदारांना खूष करण्यासाठी ताबा पावत्या, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात

मढ आश्रमशाळेची इमारत अपूर्ण; ठेकेदारांना खूष करण्यासाठी ताबा पावत्या, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात!


मुरबाड  (प्रतिनिधी) –मुरबाड तालुक्यातील मढ आश्रमशाळेची नवीन इमारत डिसेंबर महिन्यात ताब्यात घेतल्याच्या पावत्या तयार करून देण्यात आल्या पण प्रत्यक्षात काम मात्र अद्याप अपूर्ण!  असे असताना ठेकेदारांना फायदा करून देण्यासाठी आणि आगाऊ बिल अदा करण्यासाठी हा घाईघाईत ताबा स्वीकारल्याचा आरोप स्थानिकांमधून होत आहे.ही बाब अतिशय गंभीर असून बेजबाबदार मुख्याध्यापक आणि प्रकल्प अधिकारी यांची सखोल चौकशीची मागणी स्थानिक रहिवासी यांच्या कडून होतं आहे

सहा महिन्यांपूर्वी ताबा पावत्या दिल्या असल्या तरी कंपाउंड वॉल पूर्ण नाही, पाण्याची व्यवस्था नाही, वसतिगृहाचे काम अपूर्ण असल्याने मुलांच्या राहण्याची सोय नाही,ना सुरक्षितता, मात्र १५ ऑगस्टला धडाक्यात शाळा सुरू करण्यासाठी मुख्याध्यापक आणि प्रकल्प अधिकारी राजेंद्र हिवाळे यांचा आटापिटा सुरू आहे. ताबा पावत्या दिल्याने कोणत्याही स्थानिक आमदार, खासदार, पंचायत समिती, जिल्हापरिषद सदस्य किंवा प्रकल्पाचे वरिष्ठ अधिकारी यांना न बोलावता हे उदघाटन करणार असल्याचे मुख्याध्यापक बांगर यांनी सांगितले, हा सगळा गौडबंगल लपवण्यासाठी कोणालाच न बोलावता हे उदघाटन करणार असल्याचे समजल्याने स्थानिक ग्रामस्थांनी याला विरोध केला आहे.विशेष म्हणजे ज्या ठिकाणी ही आश्रम शाळा सुरु आहे ती वाडी अनेक वर्षांपासून टंचाई ग्रस्त आहे, यांच वाडीतील लोकांना सुरवातीपासूनच पिण्याच्या पाण्याची गैरसोय असल्याने यां मुलांची अवस्था काय होणार हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे ह्या शाळेतील मुलांना देखील पाण्यापासून वंचित राहावं लागणार आहे.

सर्वात मोठा सवाल म्हणजे — इमारत आणि वसतिगृह अपूर्ण असताना, ठेकेदारांच्या सोयीसाठी ताबा पावत्या का दिल्या? या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाईची मागणी स्थानिक ग्रामस्थ आणि पालकांनी केली आहे.दरम्यान, विद्यार्थी आणि पालकांचा ठाम पवित्रा आहे की, काम पूर्ण न करता शाळा सुरू करणे म्हणजे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा खेळ. प्रशासनाने तातडीने दखल न घेतल्यास मोठ्या प्रमाणात आंदोलना करण्याचा इशारा  देण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments