Type Here to Get Search Results !

विद्यानगररातील पावसाची भीती संपली; प्रभाग क्रमांक २ मधील रहिवासी आनंदी.नगरसेविका मानसी देसले यांचे मानले आभार!.

विद्यानगररातील पावसाची भीती संपली; प्रभाग क्रमांक २ मधील रहिवासी आनंदी.
नगरसेविका मानसी देसले यांचे मानले आभार!.

मुरबाड (प्रतिनिधी) –
दरवर्षी पावसाळ्यात भीतीचे सावट असलेल्या विधानगर परिसरातील नागरिकांना यंदा मोठा दिलासा मिळाला आहे. मुलांना शाळेत जाण्यासाठी दरवर्षी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. रस्त्यांवर पाणी साचणे, वाहतुकीची गैरसोय यामुळे पालक आणि विद्यार्थी दोघेही चिंतेत होते.यां उत्कृष्ट कामाबद्दल रहिवाशी संघाने नगरसेविका सौ मानसी मनोज देसले यांचे आभार माणले आहे.

मात्र, नगरसेविका सौ. मानसी मनोज देसले यांच्या पाठपुराव्यामुळे आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे यंदा परिस्थितीत मोठा बदल झाला आहे. परिसरात मूलभूत सोयीसुविधांची उभारणी, जलनिस्सारणाची योग्य व्यवस्था आणि रस्त्यांचे सुधारित काम यामुळे विधानगर परिसरातील नागरिक आनंदी झाले आहेत.

नगरसेविका मानसी देसले म्हणाल्या, “आम्ही जनतेचे सेवक आहोत. प्रभाग क्रमांक २ मधील प्रत्येक नागरिकाला आवश्यक सुविधा मिळाल्या पाहिजेत, यासाठी मी कटिबद्ध आहे. नागरिकांचे समाधान आणि आनंद हेच आमचे ध्येय आहे.”

मुरबाड नगर पंचायत क्षेत्रात सर्वत्र आनंदाचे वातावरण असून विधानगरातील रहिवाशांनी नगरसेविकांचे आभार मानले आहेत.

Post a Comment

0 Comments