मुरबाड महसूल विभागाचा भोंगळ कारभार उघड – जमीन फेरफार, बोगस सातबारा आणि आदिवासींचे प्लॉट बेकायदेशीर विक्री.
जिल्हाधिकारी यां गंभीर बाबींकडे लक्ष देणार कां?
(मुरबाड- २२/८/२०२५,अण्णा साळवे)
मुरबाड तालुक्यात महसूल खात्याचा सिंडिकेटी भ्रष्टाचार दिवसेंदिवस बोकाळत चालला आहे. कायद्याला तिलांजली देऊन अधिकारी व दलाल मंडळी मिळून “जमिनींची लूट” सुरू असल्याचे गंभीर आरोप होत आहेत.याबाबत मुरबाड तहसीलदारांची बघ्याची भूमिका असल्याची जोरदार चर्चा तालुक्यात आहे.
⚖️ गंभीर फेरफारांचे प्रकार उघड
1. भोगवतदार वर्ग २ जागा थेट वर्ग १ मध्ये रूपांतरित – शासन परवानगीशिवाय व नियम मोडून.
2. आदिवासींना वाटप झालेले प्लॉट – बेकायदेशीर सातबारा घडवून “वर्ग १” दाखवून विक्री.
3. सातबारा नोंद फेरफार – खरी मालकीदार न बदलता दुसऱ्यांची नावे टाकून नवे सातबारा तयार.
4. शासनाची मालकीची जागा – कागदपत्रे खोटी करून खाजगी विक्रीसाठी बाजारात.
5. तहसील व मंडळ कार्यालयातील मिलीभगत – गावकारकून, तलाठी ते अधिकाऱ्यांपर्यंत “साखळी भ्रष्टाचार”.
📌 शेकडो तक्रारी… पण कारवाई शून्य!
गेल्या काही वर्षांत शेकडो तक्रारी जिल्हाधिकारी, SDO, तहसील महसूल कार्यालयाकडे दाखल झाल्या. तक्रारदारांनी पुरावे, कागदपत्रे, फेरफार सातबारा यांच्या प्रती सादर करूनही आजपर्यंत ठोस कारवाई नाही.
➡️ तक्रारदार हतबल झाले आहेत.
➡️ भ्रष्ट यंत्रणा आरोपींना वाचवते, तर तक्रारदारांना दडपशाहीला सामोरे जावे लागते.
❓ जनतेचे थेट सवाल :
जिल्हाधिकारी ठाणे यांचे लक्ष का नाही?
SDO मुरबाड व तहसील महसूल अधिकारी तक्रारींवर आंधळे का?
शासनाच्या जमिनी विकल्या जातात, आदिवासींची जमीन लुटली जाते, तरी जबाबदार अधिकारी कारवाईला का घाबरतात?
💥 सामान्य शेतकरी व आदिवासींचा आक्रोश.
“आम्ही गरीब शेतकरी व आदिवासी… आमच्या नावावर आलेली जमीन बोगस सातबारा करून हडपली जाते. तक्रार केली तर दडपशाही. आमच्या हक्काची जमीन कधी परत मिळणार?”
⚠️ जनतेत संताप उसळला!
महसूल विभागातील ह्या साखळी भ्रष्टाचारामुळे मुरबाड तालुक्यात असंतोषाचे वातावरण आहे. शेतकरी, आदिवासी व नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी असून जनआंदोलनाची चिन्हे दिसत आहेत.
🗡️ “महसूल विभाग भ्रष्टाचाराचे अड्डे की नागरिकांच्या हक्कांचा रक्षक?”
🗡️ “सातबारा फेरफार प्रकरणात अधिकारी-दारोदारी की घोटाळा”
🗡️ “जमिनीची लूट – आदिवासींना न्याय कुठे?
जर याबाबत योग्य दखल घेतली गेली नाही तर लवकरच मंडळ अधिकारी,तलाठी, यांच्या विरोधात तहसीलदार कार्यालयावर आंदोलन करण्याचा इशारा तक्रारदारांनी दिला आहे.
Post a Comment
0 Comments