Type Here to Get Search Results !

मुरबाडात नवीन बस सुखाची.....आमदार किसनजी कथोरे यांच्या हस्ते लोकार्पण. प्रवासी आनंदी

🚍 मुरबाड आगारात नवीन बसचे आमदार किसनजी कथोरे यांच्या हस्ते लोकार्पण.प्रवासी वर्ग आनंदी.

पण निष्क्रिय ठेकेदारामूळे मुरबाड आगाराचे काम संथ गतीने!

मुरबाड दि. २४/८/२०२५ 

│ गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर आमदार किसनजी कथोरे यांच्या प्रयत्नातून मुरबाड तालुक्याला पाच नवीन बस मिळाल्या. लोकार्पण सोहळा मोठ्या जल्लोषात झाला आणि प्रवाश्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. मात्र या आनंदाच्या सोबतच मुरबाड आगाराच्या ठेकेदारावर संतापाचे ढगही दाटले आहेत.

🔹 बस आली पण आगार नाही!

नवीन गाड्यांमुळे प्रवास सुखकर होईल हे नक्की. पण आगाराचे बांधकाम अद्याप संथ गतीने सुरू असल्याने प्रवासी पावसात भिजत, खड्डेमय बसस्थानकात उभे राहतात. महिला, विद्यार्थ्यांना, गरोदर माता व ज्येष्ठांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो.

🔹 ठेकेदारावर चर्चेची धुलाई

बोगस ठेकेदारामुळे काम बोगसच होतंय की काय, अशी चर्चा तालुक्यात जोर धरू लागली आहे. “आगाराचे काम म्हणजे ठेकेदाराच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगल्यासारखे झाले आहे” अशीच बोचरी टिप्पणी नागरिक करीत आहेत.

🔹 आमदार किसनजी कथोरे साहेबांचा पुढाकार

आमदार किसनजी कथोरे यांनी पाच गाडयांचा लोकार्पण सोहळा करत अजून १०–१५ नवीन गाड्यांची मागणी केली असल्याचे सांगितले. “इतक्या वर्षांनी मी मुरबाडकर यांच्या सोबत सुखाचा प्रवास करत आहेत”  बस मध्ये अनेक वर्षा पासून बसलो नाही पण आज त्याचा आनंद घेतला अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
या सोहळ्यास जिल्हा परिषदेचे मा.गटनेते उल्हासभाऊ बांगर, माजी नगराध्यक्ष मोहन सासे, भाजपा अध्यक्ष जितेंद्र भावार्थे, शिवसेना अध्यक्ष कांतीलाल कंटे,लोकक्रांतीचे अध्यक्ष नरेश मोरे राष्ट्रवादी अध्यक्ष चंद्रकांत बोस्टे, आरपीआय अध्यक्ष दिनेश उघडे, संचालक सुरेश बांगर सर,रिपाई शहर अध्यक्ष कैलास देसले, गजानन साबळे,माजी नगराध्यक्ष किसन कथोरे, नगरसेवक रवींद्र देसले,माजी नगराध्यक्ष मुकेश विशे, भाजप शहराध्यक्ष सुधीर तेलवणे, भाजप अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष अण्णा साळवे,सरचिटणीस दिलीप देशमुख, चेअरमन संतोष पवार,  नना साबळे, जयवंत कराळे,ज्योतीताई गोडांबे, सुरेखाताई खोलांबे यांसह मुरबाड आगारप्रमुख मुसळे एस टी कर्मचारी तसेच भाजपा कार्यकर्ते व पत्रकार बंधू उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments