भाऊबीजच्या दिवशी आदिवासी महिलांच्या चेहऱ्यावर आनंदाची लहर — सोन्या दादा पाटील समाज कल्याण न्यासाचा हृदयस्पर्शी उपक्रम.
मुरबाड - आण्णा साळवे
मुरबाड तालुक्यातील काही वाड्या वस्त्यांमध्ये भाऊबीज या पवित्र सणाला सामाजिक बांधिलकीची जोड देत सोन्या दादा पाटील समाज कल्याण न्यास, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आदिवासी महिलांसाठी साडी व मिठाई वाटपाचा भावनिक उपक्रम राबविण्यात आला.या उपक्रमांतर्गत शहापूर, मुरबाड, वाडा आणि पालघर परिसरातील तब्बल 5000 आदिवासी महिलांना साड्या व मिठाई देऊन सणाचा आनंद वाटण्यात आला. ग्रामीण भागातील महिलांच्या चेहऱ्यावर उमटलेली आनंदाची झळाळी पाहून सणाचे खरे सौंदर्य खुलले.या उपक्रमाचे आयोजन न्यासाचे अध्यक्ष श्री. सोन्या दादा पाटील यांनी केले. “सणासुदीच्या आनंदात समाजातील प्रत्येक घटक सहभागी व्हावा, समानता आणि ऐक्य याचा संदेश सर्वत्र पोहोचावा, हा आमचा हेतू आहे,” असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमादरम्यान शाळेच्या साहित्याचेही वाटप करण्यात आले. यावेळी समाजसेविका शिल्पताई देहरकर आणि मुरबाड पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी रामा शिंदे यांनी उपस्थित राहून उपक्रमाला साथ दिली.
स्थानिक नागरिक, कार्यकर्ते आणि सामाजिक संघटनांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. सणाच्या आनंदात आदिवासी समाजाला सामील करून घेत सोन्या दादा पाटील समाज कल्याण न्यासाने उभा केलेला हा उपक्रम समाजसेवेचा प्रेरणादायी आदर्श ठरला आहे.
Post a Comment
0 Comments