ठाणे जिल्हा परिषद अधिकारी-कर्मचारी स्पर्धा 2026.
मुरबाड तालुक्याची दणदणीत कामगिरी — सांस्कृतिक रंगभूमीवर अव्वल ठसा
मुरबाड प्रतिनिधी- अण्णा साळवे
ठाणे जिल्हा परिषद आयोजित अधिकारी-कर्मचारी स्पर्धा 2026 मध्ये मुरबाड तालुक्याने अभिमानास्पद आणि दणदणीत कामगिरी करत संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतले आहे. विविध सांस्कृतिक स्पर्धांमध्ये दमदार सादरीकरण, शिस्तबद्ध तयारी आणि कलात्मकता याच्या जोरावर मुरबाड तालुक्याने अव्वल स्थान पटकावत आपली वेगळी ओळख निर्माण केली.
या स्पर्धेत मुरबाड तालुक्याच्या संघांनी एकापाठोपाठ एक उत्कृष्ट सादरीकरण करत पारितोषिकांची लयलूट केली. समूह गायन आणि समूह नृत्य या दोन्ही प्रमुख स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक पटकावत तालुक्याने सांस्कृतिक क्षेत्रातील आपली ताकद सिद्ध केली.
स्पर्धेतील ठळक यश पुढीलप्रमाणे :
🏆 समूह गायन स्पर्धा — प्रथम क्रमांक
🏆 समूह नृत्य स्पर्धा — प्रथम क्रमांक
🏆 एकपात्री सादरीकरण — द्वितीय क्रमांक — श्री. एकनाथ महादू देसले
🏆 नाट्य स्पर्धा — द्वितीय क्रमांक
🏆 वैयक्तिक गायन — तृतीय क्रमांक — श्री. भालचंद्र कृष्णा भोईर
🏆 फॅन्सी ड्रेस स्पर्धा — द्वितीय क्रमांक — श्री. सुनील दत्तात्रेय पवार
या भव्य यशामागे सन्माननीय गटविकास अधिकारी श्रीमती लता गायकवाड मॅडम, गटशिक्षणाधिकारी श्री. मधुकरजी घोरड साहेब आणि शिक्षण विस्तार अधिकारी श्री. कणकोसे साहेब यांचे प्रभावी मार्गदर्शन, नियोजन आणि प्रेरणा मोलाची ठरली. त्यांच्या नेतृत्वाखाली स्पर्धकांनी उत्कृष्ट तयारी करून विजयी झेंडा रोवला.
मुरबाड तालुक्याच्या या घवघवीत यशाबद्दल सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत असून विजयी स्पर्धकांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या यशामुळे मुरबाड तालुक्याची सांस्कृतिक ओळख अधिक भक्कम झाली आहे.
Post a Comment
0 Comments