Type Here to Get Search Results !

टेंभुर्ली गावातील अल्पवयीन विध्यार्थ्यांला जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण. किन्हवली पोलीस ठाण्यात ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल.अटक आरोपीला पोलिसांनी सोडल्याने आंबेडकरी जनतेत संताप.

टेंभुर्ली गावातील अल्पवयीन विध्यार्थ्यांला जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण.

 किन्हवली पोलीस ठाण्यात ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल.

अटक आरोपीला पोलिसांनी सोडल्याने आंबेडकरी समाजात संताप.


मुरबाड प्रतिनिधी आण्णा साळवे


 शहापूर - शहापूर तालुक्यातील टेंभूर्ली गावातील अल्पवयीन बौद्ध विधार्थी शाळेतून घरी जात असताना मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पीडित मुलाची काकू मेधा महेंद्र भडांगे यांनी दिनांक 22 नोव्हेंबर 2025 रोजी किन्हवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.. यावेळी आरोपी पोलिसांच्या ताब्यात होता. मात्र गुन्हा दाखल झाल्यानंतर किन्हवली पोलीसांच्या ताब्यात असणाऱ्या आरोपीला डि वाय एस पि. मिलिंद शिंदे यांनी आदेश दिल्यानंतर एपिआय नितीन खैरनार यांनी अटक आरोपीला सोडून दिल्याचे समजते. संताप व्यक्त करत आरोपीला पोलिसांनी तात्काळ अटक करावी अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष रविंद्र चंदणे यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.यावेळी अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष आण्णा साळवे, रिपाई सेक्युलर युवक अध्यक्ष राजेश गायकवाड, बॉस ग्रुपचे अध्यक्ष अक्षय रोकडे, तसेच युवा नेता अविनाश रातांबे उपस्थित होते.

. याबाबत सविस्तर वृत्त असे की,दिनांक 20 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी सुमारास 4.15 वाजता, सह्याद्री विद्यालयातून शाळा सुटून घरी येत असताना आरोपी सार्थक मोरेश्वर चौधरी याने पुतण्या अमित प्रमोद भडांगे (वय 15) याला “तू माझ्या वडिलांना मोरू म्हणालास” या कारणावरून रस्त्यात अडविले. त्याचा कॉलर पकडून अंगणात ओढत नेले व ठोश्याबुक्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. दरम्यान, घरातून बाहेर आलेल्या आरोपी सार्थकची आई आरोपी मेधा मोरेश्वर चौधरी हिने ‘‘ही महारांची पोरं अशीच आगाऊ असतात’’ अशा जातीय शिवीगाळ केल्याचा गंभीर आरोप फिर्यादित करण्यात आला आहे. हा संपूर्ण प्रकार अमित याचा चुलत भाऊ शुभम यांच्या उपस्थितीत घडल्याचेही फिर्यादकर्तीने म्हटले आहे. या संदर्भात अटक आरोपींना सोडल्याप्रकरणी किन्हवली पोलिसांकडे सीसीटीव्ही फुटेज ची मागणी देखील करण्यात आली आहे.
या सर्व घटनांची माहिती मोठ्या मुलांनी घरच्यांना दिल्यानंतर आज कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार दाखल केली. मात्र, सर्वात चिंताजनक बाब म्हणजे या गंभीर ऍट्रॉसिटी प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर सोडून दिल्याचा कुटुंबीयांनी आरोप करत माहिती दिली आहे.तर काहींनी सेटलमेंटसाठी दबाव आणण्यात येत असल्याचा संशयही व्यक्त होत आहे. यामुळे गावात तसेच पीडित कुटुंबीयांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. 

             या गंभीर प्रकरणी रिपाई सेक्युलर च्या कार्यकर्तेनी पिडीत कुटूंबाला भेट दिली असताना संबंधितांवर कठोर गुन्हा दाखल करून निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी पीडितांनी केली आहे. यावेळी आरोपीना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी करणार असल्याचे सांगत पिडीत कुटूंबाला धीर दिला आणि आरोपीना अटक केलेले असताना सुद्धा, सोडून का दिले? याबाबत पोलिसांची सखोल चौकशी करण्याची मागणी रिपाई सेक्युलर जिल्हाध्यक्ष रविंद्र चंदने यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments