पनीरचा घोटाळा! ८०% पनीर नकली – युरिया, डालडा आणि पाम ऑइलने बनवलेला जीवघेणा पदार्थ थाळीत"
Bedhadak SamacharAugust 08, 20250
"पनीरचा घोटाळा! ८०% पनीर नकली – युरिया, डालडा आणि पाम ऑइलने बनवलेला जीवघेणा पदार्थ थाळीत"
मुरबाड प्रतिनिधी - देशभरातील रस्त्याकडच्या ढाब्यांपासून ते ५ स्टार हॉटेल्सपर्यंत पनीरच्या डिशेसची रेलचेल असते. पण ग्राहकांच्या थाळीत येणारा पनीर किती खरा आहे, हा गंभीर प्रश्न आहे. खऱ्या दुधापासून तयार होणाऱ्या पनीरची किंमत प्रतिकिलो किमान ₹३५० ते ₹३६० असावी, तर बाजारात तो फक्त ₹२००–₹२५० ला सहज मिळतो. उघड आहे — हा पनीर दुधाचा नसून “अनालॉग पनीर” आहे.
या बनावट पनीरमध्ये पावडर दूध, पाम ऑइल, डालडा, अरारोट, केमिकल स्टेबिलायझर्स मिसळून टेक्स्चर तयार केले जाते. काही ठिकाणी तर थेट युरिया, डिटर्जेंट आणि मैद्याच्या मिश्रणातून पनीर बनवले जाते. हा घटक मूत्रपिंड, यकृतावर घातक परिणाम करून दीर्घकाळात मृत्यूचं कारण ठरू शकतो.अधिकृत आकडेवारीनुसार, देशात रोज ६४ कोटी लिटर दूध उत्पादित होते. त्यातून साधारण १.२० कोटी किलो पनीर बनू शकतो. मात्र, प्रत्यक्ष बाजारातील पनीरची मागणी व पुरवठा यामध्ये एवढा फरक आहे की ८०% पनीर नकली असल्याचं उघड होतं.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, गेल्या ३० वर्षांत यकृत व मूत्रपिंडाच्या रोगांमध्ये प्रचंड वाढ ही अशा बनावट दुग्धजन्य पदार्थांमुळे झाली आहे. दुर्दैवाने, सरकारकडे या घोटाळ्यावर कडक कायदे व दंडाची तरतूद नसल्याने, नकली उत्पादनं रोज पकडली जात असूनही उत्पादनकर्ते मोकाट फिरत आहेत.ग्राहकांनी सावध राहून पनीरच्या गुणवत्तेबाबत हॉटेल, ढाबेवाल्यांकडे सॅम्पल मागावा, अन्यथा आपल्या पैशांनी आपण आजार विकत घेत आहोत, हे लक्षात ठेवावं.
Post a Comment
0 Comments