मोरोशी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यां पितात गढूळ पाणी.
मुजोर मुख्याध्यापक प्रल्हाद भोये यांच्यावर कारवाईची मागणी
मोरोशी (ता. मुरबाड) – शहापूर प्रकल्पातील अनेक शासकीय आश्रम शाळांना अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष अण्णा साळवे यांनी, पत्रकारांना सोबत घेऊन,प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली असता मोरोशी येथील आश्रमशाळेची स्थिती अतिशय दयनीय असल्याचे समोर आले. या शाळेत विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी थेट थट्टा आणि खेळ होत असल्याने मुजोर मुख्याध्यापकावर कारवाईची मागणी केली आहे.
मागील काही दिवसा पूर्वी मंत्री महोदय यांनी या शाळेला भेट दिली असता, शाळेच्या असुविधाबाबत नाराजी व्यक्त करत मुख्याध्यापक भोये यांना चांगलाच धडा शिकवीला होता. परंतु मुजोर व बेजबाबदार मुख्याध्यापक यांनी पुन्हा दुर्लक्ष केले. सध्या स्थितीत शाळेतील पिण्याच्या पाण्याची अवस्था अत्यंत बिकट असून, वॉटर फिल्टर पूर्णपणे बंद आहे. जनरेटर देखील बंद अवस्थेत असल्याने मूलभूत सुविधा ठप्प आहेत. शाळेत गढूळ पाणी विध्यार्थी यांनी पिण्यासाठी देत असल्याने त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे तसेच शाळेच्या अवतीभवती गवताची वाढ झाल्यामुळे डास व आजारांचा प्रादुर्भाव निर्माण झाला आहे. वसतिगृहात पंखे नसल्याने विधार्थी अक्षरशः उखाडून निघत आहेत. आशा प्रकारे मुख्याध्यापक प्रल्हाद भोये यांचा मनमानी कारभार सुरू असल्याने या ठिकाणी विधार्थी मुली मुलाचा जीवन मरणाचा विषय समोर आला आहे. परिणामी सुविधा अपुऱ्या असल्याने पट संख्येत घट झाली असून याला सर्वाशी जबाबदार प्रकल्प अधीकारी आणि मुख्याध्यापक आहे. तसेच विद्यार्थ्यांकडून साफसफाईसारखी कामे करवून घेतली जात आहेत. शिजवलेले जेवण निकृष्ट दर्जाचे असून, राहण्याची व्यवस्था देखील अत्यंत हलाखीची व बिकट आहे.
सदर बाबींमुळे येथील विद्यार्थ्यांच्या आरोग्य व सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, ही संपूर्ण स्थिती पाहता तत्काळ चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी पालक व ग्रामस्थांकडून केली जात असली तरी अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचे अण्णा साळवे यांनी देखील याबाबत पुढाकार घेऊन आदिवासी विकास विभागाने जर तात्काळ कारवाई करावी अन्यथा जनआंदोलनाचा इशारा अण्णा साळवे यांनी परिसरातील ग्रामस्थांना व पालकांना घेऊन करणार असल्याचे म्हटले आहे.
Post a Comment
0 Comments