Type Here to Get Search Results !

आदिवासी दिनी वाल्हिवरे आश्रमशाळेतील विद्यार्थ्याच्या आत्महत्येवर संताप – निलंबित शिक्षकांना सेवेत रुजू करण्याचा आदेश, कारवाईची मागणी

आदिवासी दिनी वाल्हिवरे आश्रमशाळेतील विद्यार्थ्याच्या आत्महत्येवर संताप – निलंबित शिक्षकांना सेवेत रुजू करण्याचा आदेश, कारवाईची मागणी
मुरबाड (प्रतिनिधी अण्णा साळवे) – लोकसेवा शिक्षण संस्थेच्या अनुदानित आश्रम शाळा, वाल्हिवरे (ता. मुरबाड) येथे शिकणाऱ्या आदिवासी समाजातील 10 वीच्या विद्यार्थ्याने, कु. सुभाष तुळजी रावते, शाळा प्रशासन आणि व्यवस्थापनाच्या बेजबाबदार कारभाराला कंटाळून आत्महत्या केली. आदिवासी दिनी या घटनेची तीव्र दखल घेत आदिवासी समाजाने विद्यार्थ्याला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

या प्रकरणी शाळेवर गुन्हा दाखल झाला असून 4 बेजबाबदार कर्मचारी निलंबित आहेत. विभागीय चौकशी सुरू असताना देखील हे कर्मचारी मुख्यालयात हजर नसताना त्यांचे पगार काढण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. इतकेच नव्हे, एका निलंबित कर्मचाऱ्याचे फरक बिलदेखील या कालावधीत काढले गेले.

प्रभारी मुख्याध्यापकांवर खोटा पगार काढण्याचा आरोप असून त्यांच्यावर तात्काळ निलंबन व पगाराची वसुली करण्याची मागणी झाली आहे. तसेच, चौकशी अपूर्ण असताना निलंबित कर्मचाऱ्यांना सेवेत पुनःरुजू करण्याचा आदेश देणाऱ्या संस्थेच्या संचालकावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी झाली आहे.

या सर्व प्रकरणाची माहिती असूनही प्रकल्प अधिकारी, शहापूर श्री. हिवाळे यांनी हेतुपुरस्कर बोगस पगार काढण्यासाठी या कर्मचाऱ्यांना पाठीशी घातल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्यावर तात्काळ निलंबनाची आणि खात्यांतर्गत चौकशीची मागणी करून दोषींवर तात्काळ कारवाई करावी.

Post a Comment

0 Comments