Type Here to Get Search Results !

धसई सहकारी संस्थेच्या सचिवपदी रमेश घावट – शेतकरी वर्गाकडून अभिनंदन.

कोकण विभागातील ‘सर्वोत्तम सहकारी संस्था’ किताब धसई सहकारी संस्थेकडे.
सचिवपदी रमेश घावट – शेतकरी वर्गाकडून अभिनंदन
(मुरबाड प्रतिनिधी अण्णा साळवे*)

मुरबाड तालुका हा ९०% भातशेतीवर अवलंबून असून शेतकऱ्यांचा प्रपंच हा भातपिकावरच चालतो. शेतकरी वर्गाला पिककर्जापासून ते बागायतदारांना आवश्यक कर्जवाटपाची सोय धसई सहकारी संस्थेमार्फत केली जाते. परिसरातील २८ गाव व असंख्य वाड्यांतील साडेतीन हजार सभासदांसाठी ही संस्था वर्षाला तब्बल १० कोटी रुपयांचे पीककर्ज वितरीत करते. मध्य मुदत कर्ज, शेतकरी हिताचे विविध उपक्रम राबवून ही संस्था तालुक्यात आदर्श ठरली आहे.
                     या दमदार कामगिरीच्या बळावर धसई सहकारी संस्थेला कोकण विभागातील "सर्वोत्तम सहकारी संस्था" हा बहुमान मिळाला. मानपत्र व पुरस्काराने संस्थेचा गौरव करण्यात आला.   
संचालक मंडळाच्या सर्वानुमते अभ्यासू व कार्यतत्पर म्हणून ओळख असलेल्या रमेश घावट यांची सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या निर्णयाचे शेतकरी वर्गाकडून मनापासून स्वागत होत असून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

0 Comments