Type Here to Get Search Results !

सद्भावना रॅली, मुरबाड पोलिसांची जातीयवादी भूमिका?डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना हार न घालता रॅलीची सुरुवात.

सद्भावना रॅली, मुरबाड पोलिसांची जातीयवादी भूमिका?

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना हार न घालता रॅलीची सुरुवात.

मुरबाड (प्रतिनिधी) आण्णा साळवे.

मुरबाड - दि.३१/१०/२०२५
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त ठाणे ग्रामीण पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली "रन फॉर युनिटी" या सद्भावना रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीची सुरुवात मुरबाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती येथून करण्यात आली. मात्र, या कार्यक्रमाच्या सुरुवातीस उपस्थित वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासाहेब एडके आणि पोलीस उपविभागीय अधिकारी  लाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास हार न अर्पण करता रॅलीची सुरुवात केली, ही बाब सामाजिक वर्तुळात तीव्र चर्चेचा विषय ठरली आहे.

या प्रकरणावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सेक्युलर) चे ठाणे जिल्हाध्यक्ष रवींद्रजी चंदने यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत सांगितले की,

> “या कार्यक्रमादरम्यान मुरबाड पोलिसांकडे  पैसे नसल्याने  त्यांना डॉ. आंबेडकरांना अभिवादन  करण्यासाठी हार घेता आला नाही.. ही कृती अत्यंत खेदजनक असून पोलीस प्रशासनातील जातीवादी मानसिकतेचे दर्शन घडवणारी आहे.”
> “डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे संविधान निर्माता असून त्यांनी समानतेचा व न्यायाचा पाया घातला. अशा महान व्यक्तिमत्त्वाचा अपमान सार्वजनिक कार्यक्रमात होणे, हे लोकशाही व्यवस्थेला कलंक लावणारे आहे. प्रशासनाने या घटनेची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगात्मक कारवाई करावी.”

दरम्यान, नागरिकांमध्ये देखील या घटनेबाबत नाराजी व्यक्त होत असून, ‘एकता’ या नावाखाली घेतलेल्या रॅलीत विभाजनाची मानसिकता दिसल्याने प्रशासनावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
यावेळी तालुक्यातील सामाजिक, राजकीय क्षेत्रात काम करणारे असंख्य कार्यकर्ते, पोलीस कर्मचारी उपस्थित राहून सरदार वल्लभभाई पटेल यांना मानवंदना दिली.

Post a Comment

0 Comments