Type Here to Get Search Results !

आदर्श विद्यालय तुळई येथे कु. कादंबरी भालेराव हिचा सत्कार सोहळा संपन्न

आदर्श विद्यालय तुळई येथे कु. कादंबरी भालेराव हिचा सत्कार सोहळा संपन्न

मुरबाड : अण्णा साळवे 
मुरबाड -विढे गावचे माजी सरपंच भगवान यादव भालेराव यांची कन्या कु. कादंबरी भगवान भालेराव हिने दहावी एस.एस.सी. परीक्षेत ८९ टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल तिचा भव्य सत्कार समारंभ दि. १४/०२/२०२६ रोजी आयोजित करण्यात आला. संस्थेच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या कार्यक्रमात विद्यार्थिनीचा सन्मान वडिलांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला.

समारंभास संस्थेचे अध्यक्ष राजाराम वामन चौधरी, मुख्याध्यापक एस. एम. चौधरी, कैलास चौधरी, शिंदे सर, चव्हाण मॅडम व घरात सर यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी अध्यक्षांच्या शुभहस्ते सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व शैक्षणिक फाईल देऊन कु. कादंबरी हिचा गुणगौरव करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी तिच्या यशाचे कौतुक करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. विद्यालयाच्या गुणवंत परंपरेत भर घालणारा हा गौरव सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

Post a Comment

0 Comments