आदर्श पत्रकार पुरस्कार २०२६ ने संजय बोरगे सन्मानित.
प्रतिनिधी आण्णा साळवे
मुरबाड : बेधडक संपादिका मंजुषा किरण निचिते यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्राचा बुलंद आवाज दैनिक जनतेचा जनदूत या वर्तमानपत्राच्या ७ व्या वर्धापन दिनानिमित्त मुरबाड येथील कुणबी भवन येथे भव्य पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्यात बेधडक व शोधपत्रकारितेसाठी ओळख असलेले पत्रकार संजय बोरगे यांना “आदर्श पत्रकार पुरस्कार २०२६” प्रदान करून गौरविण्यात आले.
कार्यक्रमाला सल्लागार सुदामजी पाटील, श्यामसुंदर केंद्रे महाराज (वारकरी संस्था देवाची आळंदी), नरेशजी म्हाडसे, संस्थापक संपादक किरणजी निचिते, आनंदजी महाराज जोशी (अखिल वारकरी सेवा प्रतिष्ठान), नानजीभाई ठक्कर, डॉ. विश्वासराव आरोटे, सुभाष घरत, उल्हासभाऊ बांगर, सुरेशजी बांगर, दिपकजी पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
संजय बोरगे यांच्या धाडसी, अभ्यासू व जनतेच्या प्रश्नांना भिडणाऱ्या पत्रकारितेचा गौरव करत हा सन्मान प्रदान करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले. त्यांच्या लेखणीची धार आणि सामाजिक बांधिलकीमुळे हा पुरस्कार अधिक अर्थपूर्ण ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
Post a Comment
0 Comments