Type Here to Get Search Results !

मुरबाड संभाजीनगर येथे आमलकी एकादशी निमित्त भागवत सत्संग संपन्न

मुरबाड संभाजीनगर येथे आमलकी एकादशी निमित्त भागवत सत्संग संपन्न

मुरबाड (आण्णा साळवे ) :

 आमलकी एकादशीचे औचित्य साधून शुक्रवार दि. २६ फेब्रुवारी २०२६ रोजी छत्रपती संभाजीनगर, मुरबाड येथील श्री. धोंडू मंगल माळी यांच्या निवासस्थानी एकादशी भागवत सत्संग (पुष्प २४ वे) उत्साहात संपन्न झाला.

या सत्संगासाठी ठाणे जिल्ह्यातील सुप्रसिद्ध कीर्तनकार व समाजप्रबोधनकार ह.भ.प. श्री. धनाजी गायकर महाराज यांनी अमृतमय कीर्तनातून उपस्थितांना मार्गदर्शन केले. आपल्या प्रवचनात त्यांनी श्रीमद् भगवद्गीतेतील स्वधर्म पालनाचे महत्त्व पटवून सांगताना धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनकार्याचा उल्लेख केला. धर्मासाठी त्यांनी दिलेले बलिदान प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.
या वेळी उपस्थित भाविकांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज तसेच धर्मासाठी बलिदान देणाऱ्या मावळ्यांना अभिवादन केले.

दरम्यान, पुढील एकादशी भागवत सत्संग (पुष्प २५ वे) रविवार दि. १५ मार्च २०२६ रोजी रात्री ९ वाजता श्री गणेश मंदिर, छत्रपती संभाजीनगर, मुरबाड येथे आयोजित करण्यात येणार असून भाविकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. 🙏

Post a Comment

0 Comments