Type Here to Get Search Results !

बंडखोर नगरसेवक अखेर आमदार साहेबांना नतमस्तक.

बंडखोर नगरसेवक अखेर आमदार कथोरे यांना नतमस्तक.


राम पुन्हा वनवासात

मुरबाड नगरपंचायतीवर फडकणार भाजपाचा झेंडा.


मुरबाड प्रतिनिधी आण्णा साळवे 

मुरबाड - मुरबाड नगरपंचायतीतील राजकीय घडामोडींना निर्णायक वळण मिळाले असून बंडखोर नगरसेवकांनी आमदार किसन कथोरे यांच्या नेतृत्वासमोर नतमस्तक होत स्वगृही परतण्याचा निर्णय घेतल्याची जोरदार चर्चा आहे.
                परिवर्तन पॅनलमधून शिंदे गटात गेलेले रविना विनायक राव, उर्मिला सुजित ठाकरे, सेहा सागर चंबावणे,, मोहन गडगे, नम्रता नंदकुमार जाधव यांनी अखेर  शिंदे सेनेला राम राम करत भाजप मध्ये प्रवेश केला. तसेच शिंदे गटातील नितीन तेलवणे, नम्रता तेलवणे, विनोद नार्वेकर, अक्षय रोठे आणि मोनिका शेळके  हे नगरसेवक/नगरसेविका काही दिवस ‘नॉट रिचेबल’ होते.मात्र या सर्वांचे आमदार कथोरे यांच्यासोबतचे छायाचित्र व्हायरल झाल्यानंतर राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली. विकासाच्या मुद्द्यावर आणि स्थानिक नेतृत्वाच्या बळावर अखेर बंडखोरांनी माघार घेतल्याचे बोलले जात आहे.
            या घडामोडींमुळे नगरपंचायतीतील सत्ता समीकरणे पुन्हा एकदा पालटण्याची शक्यता असून, आगामी बहुमत चाचणीकडे संपूर्ण मुरबाड तालुक्याचे लक्ष लागले आहे. राजकीय पटावर आमदार साहेबांचा डाव पुन्हा वरचढ ठरणार का, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
           मात्र पहिल्यांदाच निवडून आलेले नगरसेवक राम दुधाळे यांना आमदार किसन कथोरे साहेबांनी नगराध्यक्ष पदाचा पहिला बहुमान दिला. मात्र त्यांनी गद्दारी करत परिवर्तन पॅनल ची निर्मिती केली आणि जे बंडखोरी करून संतोष चौधरी यांना नगराध्यक्ष केले. आपले राजकीय भविष्य अंधारात आहे. " तेल गेले तूप गेले हाती धुपाटणे आले " अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याचे लक्षात आल्याने शेवटी काही बंडखोर नगरसेवकांनी आमदार किसनजी कथोरे यांना नतमस्तक होत स्वगृही परतले. यामुळे पुन्हा एकदा मुरबाड नगर पंचायतीवर भाजपचा झेंडा रोवणार असल्याची चर्चा सुरु आहे.

Post a Comment

0 Comments