Type Here to Get Search Results !

मुरबाड विधानसभा माझं कुटुंब; मुरबाडकरांचा विश्वास हेच माझं बळ” – आमदार किसन कथोरे

“मुरबाड विधानसभा माझं कुटुंब; मुरबाडकरांचा विश्वास हेच माझं बळ” – आमदार किसन कथोरे

(आण्णा साळवे मुरबाड )


मुरबाड - आमदार किसन कथोरे यांनी मुरबाड विधानसभा क्षेत्राशी असलेली आपली भावनिक नाळ व्यक्त करत “मुरबाड विधानसभा ही फक्त माझी विधानसभा नाही, तर माझे कुटुंब आहे,” असे सांगितले. मुरबाडमधील प्रत्येक नागरिकाचे सुख-दुःख, आशा-आकांक्षा आणि स्वप्ने हीच आपल्या कार्याची प्रेरणा असल्याचे त्यांनी नमूद केले.

मुरबाडच्या मातीत कष्ट करणारा शेतकरी, शिक्षणासाठी झटणारा विद्यार्थी, उद्योजकतेची स्वप्ने पाहणारा तरुण आणि आपल्या कुटुंबाच्या सुरक्षित भविष्यासाठी झटणाऱ्या माता-भगिनी यांचा विश्वास जपणे हीच आपली खरी जबाबदारी असल्याचे आमदार कथोरे यांनी सांगितले. लोकांचा विश्वास हेच आपले सर्वात मोठे बळ असल्याचे त्यांनी भावनिक शब्दांत व्यक्त केले.

मुरबाड विधानसभेचा विकास हा केवळ रस्ते, पाणी, वीज किंवा इमारतींपुरता मर्यादित नसून प्रत्येक नागरिकाचे जीवनमान उंचावणे हा आपला संकल्प असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दर्जेदार शिक्षण, सक्षम आरोग्य सुविधा, युवकांसाठी रोजगाराच्या संधी, शेतकऱ्यांसाठी योग्य बाजारपेठ आणि आधुनिक सुविधा गावोगावी पोहोचवण्याचे ध्येय त्यांनी व्यक्त केले.

पारदर्शक आणि लोकाभिमुख कार्यपद्धतीने मुरबाडच्या विकासाची वाटचाल अधिक वेगाने सुरू राहील, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी सांगितले की, आपल्या सहकार्याने आणि एकत्रित प्रयत्नांनी मुरबाडला प्रगतीच्या नव्या उंचीवर नेऊ.

शेवटी “मुरबाड विधानसभा — आपला संकल्प, आपली जबाबदारी” हा संदेश देत आमदार किसन कथोरे यांनी मुरबाडकरांच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही, अशी भावनिक ग्वाही दिली.

Post a Comment

0 Comments